गेल्या वर्षाने आपल्याला रोगप्रतिकारशक्तीचं महत्त्व शिकवलं. रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर योग्य आहार आणि व्यायाम ह्या दोन्ही गोष्टी आपल्या दिनचर्येचा अपरिहार्य भाग असल्याच पाहिजेत. रोजच्या धावपळीत व्यायामासाठी थोडा वेळच मिळत नाही, या सबबीखाली व्यायाम टाळणं हे तुमच्या आरोग्यासाठी हितकारक नाही हे कायम लक्षात ठेवावे.
आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कोणत्या व्यायामांना प्राधान्य द्यावे, कोणते व्यायाम प्रकार नियमित करावेत, याबद्दल…
व्यायामामुळे होणारे फायदे :
१) व्यायाम केल्यामुळे कार्यक्षमता वाढते, कारण व्यायामामुळे शरीराला आणि सर्व अवयवांना प्राणवायू म्हणजेच
ऑक्सिजन जास्त प्रमाणात पोचवला जातो. ज्यामुळे शरीरातील उत्साह व चैतन्य वाढते.
२) व्यायामामुळे वाढलेले वजन कमी करण्यास आणि वजन कमी असल्यास ते वाढण्यास मदत होते. व्यायामामुळे वाढलेल्या कॅलरी वापरल्या जातात.
३) व्यायामामुळे शरीर अनेक रोगांशी लढण्यासाठी सक्षम होते आणि नियमित व्यायाम केल्यामुळे शारिरीक स्वास्थ्य टिकून राहते, मनाची स्थिती सुधारते, आत्मविश्वास वाढतो. व्यायामामुळे स्नायूंची शक्ती सुधारते आणि काम करण्याची सहनशक्ती वाढते.
४) व्यायामाने लवकर आणि शांत झोप लागते.
५) व्यायाम केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह वाढतो आणि ¿दय, मेंदू यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांना रक्तप्रवाह चांगला होतो. यामुळे ¿दयाचे विकार, रक्तदाब यासारख्या आरोग्य समस्यांमध्ये फायदा होतो..
६) स्त्रियांमध्येही अनेक रोगांसाठी व्यायाम महत्त्वाचे आहेत. गर्भावस्थेतसुध्दा नियमित व्यायाम केल्यामुळे गर्भाची वाढ होण्यास मदत होते.
७) त्वचा हा एक शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. व्यायामामुळे त्वचेलासुध्दा रक्तपुरवठा वाढविला जातो. यामुळे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर टाकले जातात आणि त्वचेला पोषक घटक पोचवले जातात.
काही दररोज करण्यासाठीचे व्यायाम :
सूर्यनमस्कार
अ) सूर्यनमस्कारामुळे पचनसंस्थेचे काम व्यवस्थित होते.
ब) यामुळे पोटावर ताण आल्याने पोटाची जाडी कमी होण्यास मदत होते.
क) सूर्यनमस्कारामुळे झोपेच्या समस्या कमी होऊन झोप शांत लागते.
ड) सूर्यनमस्कारामुळे मेंदूला रक्तपुरवठा होतो.
इ) यातील स्थितीमुळे शरीरामध्ये लवचिकता येते.
फ) सूर्यनमस्कार नियमित केल्यामुळे अनियमित मासिक धर्म नियमित होण्यास मदत होते.
ग) तसेच सूर्यनमस्कारामुळे डायबिटीज, ब्लड प्रेशर वगैरे समस्यांमध्ये देखील फायदा होतो.
वेगाने चालणे
वेगाने चालणे हा अतिशय सोपा व्यायाम प्रकार आहे. दररोज चालण्यामुळे रक्तदाब, डायबिटीज, वजनच्या समस्या, मानसिक ताणतणाव वगैरे समस्यांवर रोज चालण्यामुळे फायदा होतो.
सायकलिंग
कोलेस्टेरॉल वाढणे यांसारख्या समस्येवर सायकलिंग करणे हा उत्तम व्यायाम आहे.
सायकलिंग केल्याने ह्यदयरोगाचा धोका या व्यायामुळे टाळला जाऊ शकतो.
सायकलिंग हा व्यायाम दररोज केल्यामुळे श्वास संस्थेतील स्नायूंचे कामसुध्दा उत्तम प्रकारे होते.
सायकलिंग केल्यामुळे स्नायूंची शक्ती वाढते आणि त्यामुळे हातापायातील स्नायूंचे कार्य सुधारते आणि हालचाली करण्यामध्ये सोपेपणा येतो.
प्रत्येकाने आपल्या आवडी व निवडीनुसार दररोज करण्याचा व्यायाम ठरवावा. आठवड्यातून कमीत कमी पाच ते सहा दिवस तरी अर्धा तास व्यायाम करावा. एकाच प्रकारचा व्यायाम करण्यापेक्षा दिवसाआड वेगळ्या पध्दतीचा व्यायाम करावा. आपण त्रÝतुमानानुसार देखील व्यायाम बदलू शकतो.