रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थाने
आंजल्र्याचा कड्यावरचा गणपती – आंजर्ले गावात समुद्रासमोरच असलेल्ा एका उंच टेकडीवर हे गणेश मंदिर असून मंदिराचं बांधकाम माधवराव पेशवे यांचा काळातलं असावं. हे मंदिर वास्तुशास्राचा उत्तम नमुना आहे. हे ठिकाण दापोलीपासून केवळ १८ किमी अंतरावर आहे.
आसूदचं केशवराज मंदिर – हाती शंख, चक्र, गदा, पद्म घेतलेलं हे विष्णूचं रूप अतिशय देखणं रूप बघायला मिळणारं केशवराज तसेच व्ाघ्रेश्वर या दोन देवस्थानांमुळे आसूद दापोलीनजीकचं महत्त्वाचं गाव ठरलं आहे.
डोंगराच्या कुशीत असलेलं अस्सल कोकणी निसर्गसौंदर्यानं नटलेलं केशवराज मंदिर दापोली-हर्णे रस्तावर दापोलीपासून फक्त ६ कि. मी. अंतरावर असून ते आसूदबाग या नावाने ओळखलं जातं.
तामसतीर्थ – तांबूस रंगाचा समुद्र… म्हणजे पाणी तांबूस, वाळूही तांबूस रंगाची असा विलक्षण देखणा समुद्र लाडघर बुरोंडीला पाहायला मिळतो. लाडघर गावापासून पुढे गेलो की आपण थेट तामसतीर्थकडे जाऊ शकतो. इथे वेळेश्वराचं प्राचीन मंदिर असून समुद्रकिनार्यावरचं हे मंदिर अतिशय सुंदर दिसतं. याच रस्त्याने पुढे बुरोंडी गावाकडे गेल्ात की मागील उंच टेकडीवर श्रीपरशुरामाचा भव्य पुतळा दिसतो.
केळशीची महालक्ष्मी – स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा, वाळूची टेकडी, गणेश मंदिर आणि केळशीचं सुप्रसिध्द महालक्ष्मी मंदिर यामुळे रायगड-रत्नागिरी जिल्ह्यांच्ा सरहद्दीवरचं केळशी गाव उत्तम पर्यटन केंद्र बनले आहे. केळशीत उटंबर डोंगराच्या पायथ्याशीच महालक्ष्मीचं मंदिर आहे. मंदिर उत्तराभिमुख असून ते पेशवेकालीन असावं. ते वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना मानलं जातं. इ. स. १८०८ सालात ते बांधल्याचे संदर्भ आढळतात. मंदिरापुढील धर्मशाळेत गणपती व शंकराची पिंडीही आहे. परिसरात असलेल्या तळ्यात कमळे फुलतात. दोन घुमट असलेल्या मंदिरात पुढे सभागृह व गाभार्यात लक्ष्मीचं स्वयंभू स्थान आहे. हे ठिकाण दापोलीपासून २५ किमी अंतरावर आहे. याशिवाय केळशी गावात हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हैदराबादी याकूब बाबांचा दर्गाही प्रसिद्ध आहे. समुद्रकाठी उंचावर हे ठिकाण आहे.
दाभोळची चंडिका – दापोली परिसरातील देवस्थान पाहताना आवर्जून पाहावं असं एक प्राचीन स्वयंभू स्थान म्हणजे दाभोळची चंडिका. चंडिका देवीचं हे गुहेतील स्थान एक अद्भुत अनुभव देतं. नंदादीपाच्या उजेडात गुहेतील मूर्ती अचानकपणे समोर येते तेव्हा त्या दर्शनाने आपण भारावून जातो. नवसाला पावणारी देवी म्हणून भक्तांचं हे श्रद्धास्थान आहे. दापोलीपासून अंतर २८ किमी आहे.
गुहागरची दुर्गादेवी, व्याडेश्वर व उफराटा गणेश ही प्राचीन मंदिरं –
श्री व्याडेश्वर मंदिर – गुहागरातील सुप्रसिद्ध श्री व्याडेश्वर मंदिर म्हणजे एक भव्य प्राचीन शिवमंदिर आहे. मुख्य देवळात महादेवाची पिंड आहे, तर प्रांगणात श्री देवी, सूर्यनारायण, विष्णू, गणपती व मारुती अशी मंदिर आहेत. कोकणात पाऊस कमी पडला तर व्याडेश्वर पाण्यानं कोंडलं जातं व मग पाऊस पडतो अशी श्रद्धा आहे.
उफराटा गणेश – खुद्द गुहागर गावात देवपटात हे गणेशाचं स्थान असून पूर्वी हा गणेश पूर्वाभिमुख होता. मात्र समुद्राचं पाणी गावात शिरून गाव गिळकृंत करू लागलं तेव्हा तो पश्चिमाभिमुख झाला व समुद्र मागे सरला अशी एक कथा आहे. मूर्ती संगमरवराची व अतिशय सुंदर असून हे छोटेखानी मंदिर जरूर पाहण्याजोगं आहे.
दुर्गादेवीचं मंदिर – गुहागरातील वरलापाट येथील प्राचीन दुर्गादेवीचं मंदिर सध्या भक्तांना नव्या रूपात पाहायला मिळत आहे.
हेदवीचा दशभुजा लक्ष्मीगणेश – हे ठिकाण गुहागरपासून २७ किलोमीटर अंतरावर (पालशेत रोड) आहे. गुहागर-पालशेत वेळणेश्वर फाटा व हेदवी अशा मार्गाने तिथे जाता येतं. अतिशय निसर्गरम्य परिसर आणि श्रीगणेशाची विलोभनीय मूर्ती आहे. ही मूर्ती काश्मीरमधील असून गणरायाच्या सोंडेत अमृतकलश, मांडीवर लक्ष्मी तर गळ्यात नागरूपी जानवं आणि हातात धनुष्य, त्रिशूळ, गदा, मोदक, चक्र, कमळ आदी वस्तू आहेत. मंदिर पेशवेकालीन आहे.
चिपळूणची विंध्यवासिनी – यादवकालीन प्राचीन देखणी मूर्ती महिषासुरमर्दिनी विंध्यवासिनी असं हे देवीचं स्थान चिपळूण शहराच्या एका टोकाला डोंगराच्या पायथ्याशी आहे. जमिनीत गुप्त असलेलं हे मंदिर सध्या नूतनीकरणानंतर भव्य स्वरूपात थेट भेट घेता येईल.
श्री देवी विंध्यवासिनीच्या उजव्या बाजूला श्रीगणेशाची मूर्ती तर डावीकडे कार्तिकेय महाराज यांची सुंदर कोरीव मूर्ती आहे.
गणपतीपुळे – पुळ्याचा गणपती गुळ्याला गेला अशी कोकणात एक म्हण आहे. पावसजवळील गणेशगुळे या गावी एक गणेश मंदिर आहे व त्याचं नात थेट गणपतीपुळ्याच्या मंदिरातील गणेशाशी आहे असं म्हणतात. गणपतीपुळे येथील स्वयंभू मूर्ती ही मूळ रूपात आजही पाहायला मिळते. ही पूर्ण टेकडीच गणेशस्वरूप मानली जाते. समुद्राला खेटून असं हे नयनरम्य देवस्थान आहे.
करंजेश्वरी – गोविंदगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं हे ठिकाण आवर्जून भेट देण्याजोगं आहे. गोविंदगड किल्ला व करंजेश्वरी ही दोन्ही ठिकाणं पाहण्याजोगी असून चिपळूणपासून केवळ ५ किलोमीटर अंतरावर आहेत.
परशुराम – विष्णूचा सहावा अवतार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भगवान परशुरामाचं हे मंदिर चिपळूणपासून १०-१२ किलोमीटर अंतरावर आहे. कोकणभूमी ही भगवान परशुरामांनी बाण मारून समुद्र हटवून निर्माण केली असं मानलं जातं. परशुराम मंदिराच्या मागे रेणुकादेवीचं मंदिर आणि बाजूलाच बाणगंगा तलाव आहे. हे निसर्गरम्य देवस्थान भक्तांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.
कर्णेश्वर – संगमेश्वरजवळचं प्राचीन कर्णेश्वर मंदिर म्हणजे प्राचीन शिल्पकलेचा उत्तम नमुना असून केवळ मंदिराचं दगडावरील कोरीव काम पाहायला तास-दोन तास लागतात. सभामंडप आणि गाभार्यातील शिल्पं लक्ष वेधून घेतात. दशावतार, गणपती, सरस्वती यांची शिल्पं पाहात आपण आत प्रवेश करतो व शिवलिंगाचं दर्शन घेतो. अतिशय प्राचीन असं हे मंदिर १२व्या शतकापूर्वी बांधलं असावं असा समज आहे. संगमेश्वर शहरापासून केवळ ४ किलोमीटरवर आहे.
रत्नागिरीचं पतितपावन मंदिर, भगवती मंदिर–पतितपावन मंदिर – रत्नागिरी शहरालगत पतितपावन मंदिर, विश्वेश्वर मंदिर, लाल गणपती, ज्योतिबा मंदिर व भगवती मंदिर अशी आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दलित सवर्णांना एकत्र भोजनाला बसवलं ते पतितपावन मंदिर अगदी शहरातच आहे. मंदिरात लक्ष्मीनारायणाची मूर्ती असून हरिजनांसाठी खुलं झालेलं देशातलं पहिलं मंदिर आहे.
भगवती मंदिर – भगवती किल्ल्यावर या देवीचं स्थान. रत्नागिरी शहरातून रिक्षाने केवळ १५-२० मिनिटांत येथे जाता येते. तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या उंच किल्ल्यावरील हे मंदिर पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे.
मार्लेश्वर – दरवर्षी संक्रातीला श्री देव मार्लेश्वर व गिरीजादेवीचा विवाह होतो व त्यासाठी अवघं कोकण मार्लेश्वर येथे जमतं.