•   
  • संपर्क – +९१ ०२२-35578528    

  •     इमेल – sainirnay.images@gmail.com      

  • राशीभविष्य

    महिन्याचे राशीभविष्य - जानेवारी २०२३

    मेष रास

    १४ जानेवारी पासून मकरेचा सूर्य अनुकूल होईल. रेंगाळलेले प्रश्न सुटील. आर्थिक येणे वसूल होईल. आनंद वार्ता समजतील. राहत्या जागेविषयीचे प्रश्न सुटतील. योग्य निर्णय घ्याल. महिलांना गृहसौख्य मिळेल. कला साधनेत प्रगती होईल. आरोग्यात सुधारणा होईल. कामात उत्साह राहील. विद्यार्थ्यांना अध्ययनात यश मिळेल.

    वृषभ रास

    मीनेचा गुरु लाभस्थानी आहे. चिंता दूर होतील. उद्योग व्यवसायात अधिक गुंतवणूक कराल. नोकरीत बढतीचे योग येतील. वाहन सौख्य मिळेल. सामाजिक कार्यात गौरव प्राप्त होईल. इतरांना दिलेला शब्द पाळाल. पत-प्रतिष्ठा वाढेल. आवडत्या छंदासाठी वेळ द्याल. आरोग्य चांगले राहील उत्साह वाटेल.

    मिथुन रास

    महत्त्वाची कामे पूर्वार्धात करुन घ्या. धनूचा सूर्य १४ जानें. पर्यंत मदत करील. शुक्र ग्रह अनुकूल आहे. वेळेचा व संधींचा छान उपयोग कराल. तुमच्या कलागुणाना संधी प्राप्त होईल. क्रीडापटूना नैपुण्य दाखविण्याची संधी मिळेल. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. शरीरस्वास्थ्य राहील.

    कर्क रास

    ग्रहमान उत्तम आहे. सूर्य, मंगळ, बुध, गुरु व शुक्र अनुकूल आहेत. छान प्रगती होईल. नोकरी व्यवसायात अनुकूलता प्राप्त होईल. घरासंबंधीचे प्रश्न सुटतील. अनपेक्षित अर्थप्राप्ती होईल. नवीन ओळखी होतील. आरोग्य चांगले राहील. मन:स्वास्थ्य मिळेल. महिलांना आनंदवार्ता समजतील.

    सिंह रास

    १४ जाने. पासून मकरेचा सूर्य अनुकूल होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. इतरांचे देणे देऊ शकाल. मनावरचा ताणतणाव दूर होईल. मन:स्वास्थ्य मिळेल. कौटूंबिक प्रश्न कौशल्याने सोडवाल. महिलांना गृहसौख्य मिळेल. स्पर्धा-पैजा जिंकू शकाल. १७ जानें. पर्यंत मकरेचा शनी अनुकूल राहील. विद्यार्थ्यांना अध्ययनात यश मिळेल.

    कन्या रास

    चिंता करू नका. १७ जाने. पासून कुंभेचा शनी षष्ठस्थानी शुभयोगात येत आहे. तो प्रगती घडवील. नोकरी व्यवसायात अनुकूल बदल होतील. स्वावलंबी व्हाल. वेळेचा योग्य उपयोग करुन घ्याल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. नवीन जबाबदार्‍या स्वीकारू शकाल.  शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील. यशस्वी व्हाल.

    तूळ रास

    महत्त्वाची कामे पूर्वार्धात करून घ्या. धनूचा सूर्य १४ जाने. पर्यंत मदत करील. स्वावलंबी व्हाल. अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. नवीन संधी प्राप्त होतील. आप्तेष्ट मित्रांशी हितसंबंध सुधारतील. शरीरस्वास्थ्य राहील. मनोबल चांगले राहील. महिलांना कलक्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थांना यश मिळेल.

    वृश्चिक रास

    १७ जाने. पर्यंत मकरेचा शनी अनुकूल राहील. १४ जाने. पासून मकरेचा सूर्य शुभयोगात येईल. संघर्ष टाळण्यात यशस्वी व्हाल. राहत्या जागेसंबंधीचे प्रश्न सुटतील. इतरांना मदत-मार्गदर्शन कराल. शाबासकी मिळवाल. आर्थिक बचतीकडे जास्त लक्ष द्याल. महिलांना प्रगती साधता येईल. आरोग्यात सुधारणा होईल.

    धनू रास

    १७ जाने. पासून कुंभेचा शनी धनस्थानी शुभयोगात येईल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. मंगळ-शुक्र प्रसन्न राहतील. कौटुंबिक ताणतणाव दूर होतील. कर्तव्यपूर्तीकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. महिलांना कलाक्षेत्रात प्रगती साधना येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा जिंकता येतील.

    मकर रास

    ग्रहमानाची विशेष मदत मिळणार नाही. मेहनत वाढवावी लागेल. प्रयत्नात सातत्य ठेवावे लगेल. संघर्ष टाळणे हिताचे होईल. सामंजस्य सहनशीलता आणि सौजन्याने वागावे लगेल. मोठ्या लोकांचे मार्गदर्शन घ्यावे. वेळेचा योग्य उपयोग करून घ्यावा. आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावे लागेल.

    कुंभ रास

    महत्त्वाची कामे पूर्वार्धात करून घ्या. धनूचा सूर्य १४ जाने. पर्यंत मदत करील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावे. धोका पत्करुन कोणतीही गोष्ट करू नका. संयमाने वागावे. दूरदृष्टीने निर्णय घ्यावेत. आप्तेष्ट-मित्रांच्या भेटीगाठी होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

    मीन रास

    ग्रहमान अनुकूल आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. नोकरी व्यवसायात अनपेक्षित संधी प्राप्त होतील. दैवाची मर्जी राहील. कलावंत क्रीडापटू यांना मानसन्मान प्राप्त होईल. सूचक घटनांद्वारे मार्गदर्शन मिळेल. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य चांगेल राहील. महिलांना मौल्यवान वस्तू खरेदी करता येतील.

    महिन्याचे राशीभविष्य - फेब्रुवारी २०२३

    मेष रास

    सूर्य, बुध, शुक्र आणि शनी अनुकूल आहेत. अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. पूर्वीची रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. इतरांना मदत कराल. आरोग्य चांगले राहील. समाधान वाटेल. कार्यक्षमता वाढेल. महिलांना प्रगती साधता येईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा जिंकता येईल.

    वृषभ रास

    १३ फ्रेबु. पासून कुंभेचा सूर्य अनुकूल होईल. प्रश्न सुटतील. प्रारंभी खर्चावर नियंत्रण ठेवावे. चांगली संगत ठेवावी. मेहनत सार्थकी लागेल. अधात्मिक साधनेत यश मिळेल. अधिकार प्राप्तीचे योग येतील. महिलांना गृह व्यवस्थापनात. यश मिळेल. प्रसंगावधान दाखवाल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. शरीरस्वास्थ्य राहील.

    मिथुन रास

    ग्रहमानाची विशेष मदत नाही. प्रयत्न, मेहनत वाढवावी लागेल. संयम, सावधानता आणि सहनशीलता ठेवावी. आर्थिक गुंतवणूक सावधानतेने करावी. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. शरीरस्वास्थ्याकडे लक्ष द्यावे. सुसंवादाने कामे करावी. संघर्ष टाळावा. कर्तव्यपूर्तीकडे जास्त लक्ष द्यावे. अध्ययन ठीक चालेल.

    कर्क रास

    महत्त्वाची कामे पूर्वार्धात करा. मकरेचा सूर्य १३ फेब्रु. पर्यंत अनुकूल आहे. मंगळ, बुध, गुरु व शुक्र प्रसन्न आहेत. मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक लाभ होतील. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. कार्यक्षमता वाढेल. इतरांना मदत कराल. अंदाज खरे ठरतील. योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. आरोग्य छान राहील.

    सिंह रास

    सूर्य, बुध व शुक्र अनुकूल आहेत. ग्रहमान चांगले आहे. मेहनत सार्थकी लागेल. नोकरी व्यवसायात लाभ होतील. छान प्रगती होईल. कलावंतांना पुरस्कार मिळतील. महिलांना गृहव्यवस्थापना बरोबरच अर्थार्जन करता येईल. कार्यतत्परता दाखवाल. मोठ्या लोकांच्या भेटीगाठी होतील शरीरस्वास्थ्य राहील.

    कन्या रास

    छान प्रगती होईल १३ फ्रेबु. पासून कुंभेचा सूर्य अनुकूल होईल. बुध, गुरु व शनी शुभयोगात आहेत. आर्थिक लाभ होतील. कर्तृत्वाला संधीची जोड मिळेल. स्पर्धा-पौजा जिंकाल. राहत्या घराविषयीचे प्रश्न सुटतील. उद्योग व्यवसायात अधिक गुतवणूक कराल. इतरांना मदत कराल. महिलांना गृहसौख्य मिळेल.

    तूळ रास

    मेहनतीवरच भर द्यावा लागेल. ग्रहमान अनुकूल नाही. सावधानता ठेवावी. संयमाने वागावे. अनावश्यक खर्च टाळावा लागेल. सुसंवाद ठेवून कृती करावी. संघर्ष टाळावा. महिलांनी आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावे. मन:स्वास्थ्य जपावे. नवीन जबाबदारी घेताना काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी अध्ययनाकडे लक्ष द्यावे.

    वृश्चिक रास

    महत्त्वाची कामे पूर्वार्धात करा. मकरेचा सूर्य १३ फेब्रु. पर्यंत मदत करील. बुध, गुरु व शुक्र शुभयोगात आहेत. प्रगतीसाठी संधी मिळेल. उद्योग व्यवसायात अधिक गुंतवणूक कराल. हितसंबंध सुधारतील. इतरांचे देणे फेडाल. मन:स्वास्थ्य मिळेल. आनंदवार्ता समजतील. अध्यनात यश मिळेल.

    धनू रास

    १३ फेब्रु. पासून कुंभेचा सूर्य अनुकूल होईल. दैवाची मदत मिळेल. तुमचे अंदाज खरे ठरतील. उद्योग व्यवसायात अधिक गुंतवणूक कराल. नवीन आव्हाने स्वीकाराल. प्रगती होईल. खर्चावर नियंत्रण ठेवाल. शरीरस्वास्थ्य राहील. महिलांना कलाक्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा जिंकला येईल.

    मकर रास

    बुध-शुक्र वगळता इतर ग्रह अनुकूल नाहीत. मेहनत वाढवावी. नवीन जबाबदार्‍या स्वीकाराव्या लागतील. अनावश्यक खर्च टाळावा. वेळेचे भान ठेवावे. प्रलोभने टाळावीत. नियम पाळावेत. आरोग्यकडे जास्त लक्ष द्यावे. हेही दिवस जातील. पुन्हा दैवाची अनुकूलता लभेल अध्ययनात यश मिळेल.

    कुंभ रास

    मीनेचा गुरु धनस्थानी आहे. तो मदत करील. नोकरी व्यवसायात छान प्रगती होईल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक बचतीकडे जास्त लक्ष द्यावे. प्रवास कार्यसाधक होतील. इतरांशी हितसंबंध सुधारतील. स्पर्धा पैजा जिंकाल. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

    मीन रास

    १३ फेब्रु. पर्यंत मकरेचा सूर्य मदत करील. मंगळ, बुध व शुक्र प्रसन्न आहेत. प्रगतीचा वेग वाढेल. दूरदृष्टी ठेवून कृती करावी. कार्यक्षमता वाढेल. कार्यतत्परता दाखवाल. विरोधक माघार घेतील. राजकारणातील डावपेच यशस्वी होतील. आरोग्य छान राहील. कामात उत्साह राहील. अध्ययन ठीक चालेल.

    महिन्याचे राशीभविष्य - मार्च २०२३

    मेष रास

    ग्रहमान उत्तम आहे. जास्त मेहनत करा. मोठे यश मिळवा. आर्थिक लाभ होतील. बचतीकडे अधिक लक्ष द्या. इतरांशी हितसंबंध सुधारतील. कामे यशस्वी होतील. स्वावलंबी व्हाल. गृहसौख्य लाभेल. कला क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळेल. आवडत्या छंदाला वेळ द्याल. प्रवास कार्यसाधक होतील. आरोग्य छान राहील.

    वृषभ रास

    सूर्य, बुध, गुरु व शुक्र अनुकूल आहेत. सर्व कामे मार्गी लागतील. मेहनतीस न्याय मिळेल. स्वावलंबी व्हाल. सूचक घटनांद्वारे मार्गदर्शन मिळेल. स्पर्धा-पैजा जिंकाल. कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. प्रवास कार्यसाधक होतील. नवीन ओळखी होतील. यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांना छान यश मिळेल.

    मिथुन रास

    १५ मार्च पासून मीनेचा सूर्य मदत करील. अनपेक्षित लाभ होतील. नवीन कामे स्वीकारुन ती यशस्वी कराल. हितकारक घटना घडतील. मनोबल वाढेल. आर्थिक गुंतवणुकीकडे जास्त लक्ष द्याल. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. दुकानदारी, दलाली यात लाभ होतील. महिलांना मन:स्वास्थ्य लाभेल. अध्ययनात यश मिळेल.

    कर्क रास

    मंगळ, बुध, गुरु व शुक्र स्वप्ने साकार करतील. छान प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रश्न सुटतील. योग्य कृती कराल. आनंदवार्ता समजतील. महत्त्वाच्या भेटीगाठी होतील. समय सूचकता दाखवाल. सामाजिक कार्य कराल. इतरांची शाबासकी मिळवाल. महिलांना प्रगती साधता येईल. मेहनत सार्थकी लागेल.

    सिंह रास

    कुंभेचा सूर्य १५ मार्च पर्यंत अनुकूल आहे. महत्त्वाची कामे करून घ्या. मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. खर्च वाढला तरी योग्य कारणासाठी होईल. नवीन ओळखींचा छान उपयोग कराल. दैवाची मदत मिळेल. स्वावलंबी व्हाल. नवीन योजना कार्यान्वित कराल. घरगुती प्रश्न कौशल्याने सोडवाल. जिद्दीने वागाल.

    कन्या रास

    सूर्य, बुध, गुरु, शुक्र व शनी अनुकूल आहेत. प्रत्येक कामात यश मिळेल. छान प्रगती होईल. आर्थिक येणे वसूल होईल. सुसंवाद साधून कामे कराल. इतरांची शाबासकी मिळवाल. स्पर्धा-पैजा जिंकाल. धार्मिक मंगल कार्मात सहभागी व्हाल. दिलेला शब्द पाळाल. अपेक्षित यश प्राप्त होईल.

    तूळ रास

    १५ मार्च नंतर मीनेचा सूर्य मदत करील. स्पर्धा- पैजा जिंकाल. मनोबल वाढेल बुध-शुक्र मदत करतील. परिस्थिती सुधारेल. खर्चावर नियंत्रण ठेवाल. प्रवासात वेळेचे भान ठेवावे. मौल्यवान वस्तुस जपावे. प्रलोभनांपासून दूर रहावे. महिलांना शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

    वृश्चिक रास

    बुध, गुरु व शुक्र अनुकूल आहेत. चिंता दूर होतील. उद्योग व्यवसायात आधिक गुंतवणूक करू शकाल. खर्च योग्य कारणासाठी होईल. सामाजिक कार्यात भाग द्याल. प्रवास कार्यसाधक होतील. इतरांशी हितसंबंध सुधारतील. नवीन जबाबदार्‍या स्वीकाराल. महिलांची कार्यक्षमता वाढेल. घरगुती प्रश्न सुटतील.

    धनू रास

    महत्त्वाची कामे पूर्वार्धात करा. कुंभेचा सूर्य १५ मार्चपर्यंत मदत करील. मंगल, बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. ग्रहमानाची उत्तम मदत मिळेल. सुसंवाद साधून कामे करून द्य्याल. अनपेक्षित लाभ होतील. नवीन ओळखी होतील. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील. अध्ययन छान चालेल.

    मकर रास

    १५ मार्च नंतर मीनेचा सूर्य अनुकूल होईल. कार्यक्षमता वाढेल. कामे मार्गी लागतील. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. नवीन आव्हाने स्वीकाराल. ती यशस्वी कराल. आनंदवार्ता समजतील. प्रवास कार्यसाधक होतील. राहत्या घराविषयीचे प्रश्न सुटतील. आरोग्य छान राहील. उमेद राहील.

    कुंभ रास

    बुध, गुरु व शुक्र अनुकूल आहेत. छान प्रगती होईल. पूर्वीचे प्रश्न कौशल्याने सोडवाल. दैवाची मर्जी राहील. अधिकारांचा योग्य वापर कराल. इतरांशी हितसंबंध सुधारतील. मोठ्या योजना कार्यान्वित कराल. धार्मिक मंगल कार्यात भाग द्याल. समयसूचकता दाखवाल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

    मीन रास

    ग्रहमानावर जास्त अवलंबून राहू नका. मेहनतीवरच भर द्या. नवीन ओळखी होतील. संयमाने वागा. हेही दिवस जातील. आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. मन: स्वास्थ्यास जपावे. लागेल. कामाचा ताण वाढेल. कौशल्याने कृती करावी लागेल. प्रवास योग येतील. अध्ययन छान चालेल.

    महिन्याचे राशीभविष्य - एप्रिल २०२३

    मेष रास

    मिथुनेचा मंगळ पराक्रम स्थानी शुभयोगात आहे. वृषभेचा शुक्र धनस्थानी आणि कुंभेचा शनी लाभस्थानी आहे. छान ग्रहमान तुमची प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रश्न सुटतील. व्यवहार कौशल्य दाखवाल. गृहसौख्य लाभेल. प्रवास कार्यसाधक होतील. दिलेला शब्द पाळाल. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील.

    वृषभ रास

    महत्त्वाची कामे पूर्वार्धात करा. १४ एप्रिल पर्यंत मीनेचा सूर्य अनुकूल राहील. नवीन ओळखी होतील. नोकरीत बढ़ती मिळेल. उद्योग व्यवसायात छान प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील. कार्यक्षमता वाढेल. पूर्वी न जमलेली कामे यशस्वी कराल. २१ एप्रिलपर्यंत मीनेचा गुरु मदत करील. कौटुंबिक प्रश्न कौशल्याने सोडवाल. आरोग्य चांगले राहील.

    मिथुन रास

    २१ एप्रिलपासून मेषेचा गुरु अनुकूल होईल. सूर्य, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. तुमची स्वप्ने साकार होतील. दैवाची मर्जी राहील. आपले अंदाज खरे ठरतील. योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. पैजा जिंकाल. इतरांची शाबासकी मिळवाल. महिलांना आनंदवार्ता समजतील. कौटुंबिक प्रगती होईल. विद्यार्थ्यांना छान यश मिळेल.

    कर्क रास

    मीनेचा गुरु २१ एप्रिलपर्यंत अनुकूल राहील. १४ एप्रिलपासून मेषेचा सूर्य शुभयोगात येईल. तुमचे विचार व कृती इतरांना प्रेरणा देईल. उद्योग व्यवसायात अधिक गुंतवणूक कराल. छान लाभ होतील. प्रसंगावधान दाखवाल. कलावंत व क्रीडापटू  यांना मानसन्मान प्राप्त होतील. वेळेचा व संधींचा छान उपयोग कराल. महिलांना गृहव्यवस्थापनात यश मिळेल.

    सिंह रास

    आता परीस्थितीत अनुकूल बदल होतील. २१ एप्रिल पासून मेषेचा गुरु भाग्यस्थानी शुभयोगात येईल. अनपेक्षित लाभ होतील. धार्मिक मंगल कार्यात भाग घ्याल. आनंदवार्ता समजतील. कर्तव्यपूर्तीसाठी वेळ व पैसे खर्च कराल. समाधान वाटेल. आप्तेष्ट मित्रांच्या भेटीगाठी होतील. अधिकार प्राप्तीचे योग येतील. आरोग्यात सुधारणा होईल. उत्साह वाटेल.

    कन्या रास

    पूर्वार्धात मीनेचा सूर्य व मीनेचा गुरु अनुकूल आहेत. महत्त्वाची कामे पूर्वार्धात करून घ्या. ती यशस्वी होतील. व्यवहार कौशल्य  दाखवाल. कुंभेचा शनीही अनुकूल आहे. आर्थिक गुंतवणुकीवर चांगल फायदा होईल. आप्तेष्ट-मित्रांशी हितसंबंध सुधारतील. आनंदवार्ता समजतील. आरोग्य छान राहील.

    तूळ रास

    २१ एप्रिल पासून मेषेचा गुरु सप्तस्थानी शुभयोगात येईल. विवाहेच्छुकांची स्वप्ने साकार होतील. घरगुती प्रश्न सुटतील. सूर्य आणि शुक्र शुभयोगात आहेत. आर्थिक लाभ होतील. इतरांचे देणे फेडाल. खर्चाचे प्रश्न सुटतील. अनपेक्षित लाभ होतील. कल्पकता दाखवून कामे कराल. महत्त्वाकांक्षी रहाल. मेहनत कराल.

    वृश्चिक रास

    मीनेचा गुरु २१ एप्रिल पर्यंत मदत करील. १४ एप्रिलपासून मेषेचा सूर्य अनुकूल होईल. काही लाभदायक घटना घडतील. तुमचे अंदाज खरे ठरतील. इतरांना मदत, मार्गदर्शन कराल. सूचक घटनांद्वारे मार्गदर्शन मिळेल. व्यवहार कौशल्य दाखवाल. सामंजस्य दाखवाल. प्रवास घडतील. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील.

    धनू रास

    मागील काही दिवस ताणतणावात गेले. २१ एप्रिलपासून मेषेचा गुरु अनुकूल होईल. परिस्थितीत सुधारणा होईल. विरोधकांचा विरोध मावळेल. कर्तव्यपूर्तीकडे जास्त लक्ष द्याल. कलावंतांना मानसन्मान प्राप्त होतील. नवीन ओळखी होतील. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. वेळेचा, संधीचा योग्य उपयोग कराल.

    मकर रास

    १४ एप्रिलपर्यंत मीनेचा सूर्य अनुकूल राहील. महत्त्वाची कामे तो पर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. स्पर्धा-पैजा जिंकाल. मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. त्यांची मदत होईल. आवडत्या छंदासाठी वेळ द्याल. जमा-खर्चाची स्पर्धा राहील. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. मुलांकडून प्रगतीच्या आनंदवार्ता समजतील.

    कुंभ रास

    पूर्वार्धात मीनेचा गुरु आणि उत्तरार्धात मेषेचा सूर्य अनुकूल राहतील. प्रगतीसाठी उत्तम संधी प्राप्त होतील. इतरांची मने जिंकून घ्याल. नोकरीत प्रगती होईल. उद्योग व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्याची संधी प्राप्त होईल. प्रवास कार्यसाधक होतील. नवीन जबाबदार्‍या स्वीकारून पूर्ण कराल. दैव अनुकूल राहील.

    मीन रास

    मागील काही दिवस त्रासाचे गेले. आता परिस्थिती सुधारेल. २१ एप्रिलपासून मेषेचा गुरु धनस्थानी शुभयोगात येत आहे. तो खूप मदत करील तुमची स्वप्नेसाकार होण्यासाठी. स्वावलंबी होण्यावर भर द्याल. मोठ्या लोकांच्या भेटीगाठी. होतील. महिलांना कलाक्षेत्रात प्रगती साधता येईल. स्पर्धा जिंकाल.

    महिन्याचे राशीभविष्य - मे २०२३

    मेष रास

    मंगळ, शुक्र व शनी तुमच्यावर प्रसन्न आहेत. मेहनतीस योग्य न्याय मिळेल. कार्यक्षमता वाढेल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. उद्योग व्यवसायात अधिक गुंतवणूक करण्याची संधी प्राप्त होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. अधिक मोठया यशासाठी प्रयत्न कराल. दिलेला शब्द पाळाल. आरोग्यात सुधारणा होईल.

    वृषभ रास

    मंगळ व शुक्र मदत करतील. अर्थप्राप्ती झाली तरी खर्च खूप वाढेल. बचत करणे कठीण होईल. व्यवहारी रहावे लागेल. पूर्वीच्या चुका दुरूस्त कराल. आप्तेष्ट-मित्रांशी हितसंबंध सुधारतील. संघर्ष टाळून कृती कराल. राहत्या घराविषयींचे प्रश्न सुटतील. प्रलोभनांपासून दूर रहाल. यशस्वी व्हाल.

    मिथुन रास

    ग्रहमान उत्तम आहे. मेषेचा सूर्य १५ मे पर्यंत मदत करील. बुध, गुरु व शुक्र शुभयोगात आहेत. प्रत्येक कामात यश मिळेल. हितकारक घटना घडतील. मौल्यवान वस्तूंची खरेदी होईल. महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. आरोग्यात सुधारणा होईल. मन:स्वास्थ्य मिळेल. आप्तेष्ट मित्रांशी हितसंबंध  सुधारतील. अध्ययन ठीक चालेल.

    कर्क रास

    सूर्य, बुध व शुक्र अनुकूल आहेत. चिंता करू नका. विरोधक माघार घेतील. मार्गातील अडथळे दूर होतील. समाजकार्यात भाग घ्याल. इतरांना मदत कराल. आर्थिक गुंतवणुकीकडे जास्त लक्ष द्याल. शरीरस्वास्थ्य राहील. प्रवास यशस्वी होतील. आप्तेष्ट मित्रांच्या भेटीगाठी होतील. कलावंतांचा मूड लागेल. मानसन्मान मिळतील.

    सिंह रास

    १५ मे नंतर वृषभेचा सूर्य अनुकूल होईल. गुरु व शुक्र प्रसन्न आहेत. यशस्वी व्हाल. अर्थप्राप्ती होईल. स्वावलंबी व्हाल. सुसंवाद साधून कामे कराल. नवीन आव्हाने स्वीकारून ती यशस्वी कराल. संधीचे सोने कराल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आरोग्य चांगले राहील. उत्साह वाटेल.

    कन्या रास

    मंगळ, बुध, शुक्र व शनी अनुकूल आहेत. आनंदवार्ता समजतील. तुमच्या मेहनतीस न्याय मिळेल. इतरांचे सहकार्य मिळेल. अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. महत्त्वाचे निर्णय घ्याल. अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. प्रलोभने टाळू शकाल. हिंमत दाखवाल. महिलांना गृहव्यवस्थापनेत यश मिळेल. आनंद वाटेल.

    तूळ रास

    मेषेचा सूर्य १५ मे पर्यंत मदत करील. मेषेचा गुरु सप्तमस्थानी शुभयोगात आहे. ग्रहमान उत्तम आहे. दैवाची मदत मिळेल. मेहनत सार्थकी लागेल. वेळेचा व संधांrचा योग्य उपयोग करून घ्याल. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. प्रिय भेटीगाठी होतील. महिलांना स्वत:ची प्रगती साधता येईल. शरीरस्वास्थ्य राहील.

    वृश्चिक रास

    सूर्य, बुध व शुक्र यांची कृपा राहील. आपले अंदाज खरे ठरतील. योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. धार्मिक मंगल कार्यात भाग घ्याल. इतरांची मदत मिळेल. आर्थिक गुंतवणुकीकडे जास्त लक्ष द्याल. बचतही कराल. कौटुंबिक प्रश्न हळुवारपणे सोडवाल. मुलांकडून प्रगतीच्या वार्ता समजतील.

    धनू रास

    १५ में नंतर वृषभेचा सूर्य मदत करील. बुध, गुरु, शुक्र व शनी अनुकूल आहेत. व्यवहार कौशल्य दाखवाल. प्रयत्न यशस्वी होतील. अनपेक्षित लाभदायक घटना घडतील. मनोबल वाढेल. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील. उत्साह राहील. कार्यक्षमता वाढेल. पूर्वीच्या चुका सुधारू शकाल. स्पर्धा-पैजा जिंकाल.

    मकर रास

    मिथुनेचा मंगळ १० मे पर्यंत मदत करील. व्यवहारी राहाल. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. खर्च खूप होईल. जमा खर्चाचे गणित बिघडेल. संयम, सहनशीलता व सावधानता ठेवावी लागेल. वादविवाद व संघर्षापासून दूर रहावे. शांतपणे निर्णय घ्यावेत. आरोग्यावर ताण पडेल. काळजी घ्यावी.

    कुंभ रास

    महत्त्वाची कामे १५ मे पर्यंत करुन घ्यावीत. मेषेचा सूर्य अनुकूल राहील. कार्यक्षमता वाढवून कामांचा उरक ठेवावा लागेल. मंगळ-शुक्र शुभयोगात आहेत. अर्थप्राप्ती होईल. तरीही खर्चावर नियंत्रण ठेवावे. नवीन संधींचा शोध घ्यावा लागेल. वेळेचे भान ठेवावे लागेल. आरोग्य ठीक राहील. गृहसौख्य मिळेल.

    मीन रास

    १५ मे नंतर वृषभेचा सूर्य अनुकूल होईल. बुध, गुरु व शुक्र शुभयोगात आहेत. तुमचे निर्णय योग्य असतील. सामंजस्य दाखवून प्रश्न सोडवाल. इतरांची मने जिंकून घ्याल. कामे मार्गी लगतील. आनंदवार्ता समजतील. विवाहेच्छुकांचे विवाह जमतील. कौंटुंबिक प्रश्न कौशल्याने सोडवाल.

    महिन्याचे राशीभविष्य - जून २०२३

    मेष रास

    १५ जूननंतर मिथुनेचा सूर्य शुभयोगात येईल. बुध, शुक्र व शनी अनुकूल आहेत. नोकरी व्यवसायात छान प्रगती होईल. वेळेचा व संधींचा योग्य उपयोग करून घ्याल. नवीन आव्हाने स्वीकरून ती यशस्वी कराल. खर्च योग्य कारणांसाठी होईल. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील. आनंदवार्ता समजतील.

    वृषभ रास

    मंगळ, बुध व शुक्र तुमची स्वप्ने साकार करतील. अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. कलावंतांच्या हातून कलाकृती निर्माण होतील. प्रसंगावधान दाखवाल. इतरांची मने जिंकून घ्याल. संयमाने वागाल. महिलांना गृहव्यवस्थापनात यश मिळेल. बचतीकडे लक्ष द्‌याल. प्रश्न सोडवाल.

    मिथुन रास

    मंगळ, बुध, गुरु व शुक्र प्रसन्न आहेत. छान प्रगती होईल. सामाजिक कार्य कराल. प्रवास कार्यसाधक होतील. अनपेक्षित भेटीगाठी होतील. आनंदवार्ता समजतील. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. कामात उत्साह राहील. यशस्वी व्हाल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. महिलांना गृहव्यवस्थापनात यश मिळेल.

    कर्क रास

    महत्त्वाची कामे पूर्वार्धात करून घ्या वृषभेचा सूर्य १५ जूनपर्यंत मदत करील. खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण जाईल. कामात वाढ होईल. आरोग्यावर ताण पडेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. विरोधकांचा विरोध वाढेल. संघर्ष टाळणे हिताचे होईल. मुलांच्या प्रगतीकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. यश मिळेल.

    सिंह रास

    सूर्य, बुध, गुरु व शुक्र अनुकूल आहेत. जास्तीत जास्त कामे करून मोठे यश मिळवू शकाल. कार्यक्षमता वाढेल. अर्थप्राप्ती होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. अधिकार प्राप्तीचे योग्य येतील. महिलांना आनंदवार्ता समजतील. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील. कामात उमेद-उत्साह राहील. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.

    कन्या रास

    १५ जूननंतर  मिथुनेचा सूर्य अनुकूल होईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. इतरांचे सहकार्य मिळेल. उद्योग व्यवसायात अधिक गुंतवणूक कराल. बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. चिंता दूर होतील. आरोग्यात सुधारणा होईल. घरगुती प्रश्न कौशल्याने सोडवाल. व्यवहारी रहाल. महिलांना गृहसौख्य मिळेल.

    तूळ रास

    मंगळ, बुध व गुरु शुभयोगात आहेत. चिंता करू नका. सर्व गोष्टी मनासारख्या होतील. नोकरीत बदल करू इच्छिणार्‍यांना संधी मिळेल. व्यवसाय-उद्योगात अधिक गुंतवणूक करू शकाल. नवीन कार्यक्षेत्राचा परिचय होईल. परोपकार कराल. कलावंत, क्रीडापटू, संशोधक यांना मानसन्मान प्राप्त होतील. आरोग्य छान राहील.

    वृश्चिक रास

    महत्त्वाची कामे पूर्वार्धात करा. वृषभेचा सूर्य १५ जून पर्यंत मदत करील. कर्तृत्त्वाला संधीची जोड मिळेल. बुध-शुक्र अनुकूल आहेत. खर्च मात्र वाढणार आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रलोभनांपासून दूर रहावे. मन:स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल. आरोग्य ठीक राहील. चिंता नसावी.

    धनू रास

    ग्रहमान उत्तम आहे. जे कार्य हाती घ्याल ते यशस्वी कराल. सूर्य, बुध गुरु, शुक्र व शनी प्रसन्न आहेत. उद्योग व्यवसाय छान चालेल. नोकरीत बढतीचे योग येतील. प्रिय भेटीगाठी होतील. आनंदवार्ता समजतील. स्पर्धा-पैजा  जिंकाल. शरीरस्वास्थ्य राहील. मन:स्वास्थ्य चांगले राहील. यश मिळेल.

    मकर रास

    प्रारंभी निर्माण झालेले प्रश्न उत्तरार्धात सुटतील. १५ जून पासून मिथुनेचा सूर्य मदत करील. नवीन जबाबदार्‍या स्वीकारून त्या यशस्वी करून दाखवाल. आर्थिक बचतीकडे जास्त लक्ष द्याल. विरोधक माघार घेतील. मार्गातील अडथळे दूर होतील. आरोग्य छान राहील. यशस्वी व्हाल. मनोबल वाढेल.

    कुंभ रास

    ग्रहमानाची विशेष मदत नाही. स्वकर्तृत्त्वावर अवलंबून रहावे लागेल. स्वावलंबी होण्यावर भर द्यावा लागेल. वेळेचे भान ठेवावे. मेहनतीत सातत्य ठेवावे लागेल. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. इतरांचे सहकार्य घ्या. अंतिम यश तुमचेच असेल. आरोग्यावर ताण पडेल. विद्यार्थ्यांना छान यश मिळेल.

    मीन रास

    वृषभेचा सूर्य १५ जून पर्यंत मदत करील. मंगळ, बुध, गुरु व शुक्र मदत करतील. अर्थप्राप्ती होईल. मनासारखा खर्च कराल. समाधान प्राप्त होईल. नवीन कामे स्वीकारून ती यशस्वी करून दाखवाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. प्रसंगावधान दाखवाल. इतरांची शाबासकी मिळवाल. शरीरस्वास्थ्य राहील.

    महिन्याचे राशीभविष्य - जुलै २०२३

    मेष रास

    मिथुनेचा सूर्य १६ जुलै पर्यंत मदत करील. बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. कष्ट सार्थकी लागतील. व्यवहारात आर्थिक लाभ होतील. यशस्वी व्हाल. इतरांचे छान सहकार्य मिळेल. मिळलेल्या संधीचे सोने कराल. इतरांची शाबासकी मिळवाल. कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळेल. शरीरस्वास्थ्य मिळेल.

    वृषभ रास

    १६ जुलैनंतर कर्केचा सूर्य अनुकूल होईल. प्रिय घटना घडतील. नवीन कार्याचा परिचय होईल. स्वीकारलेली जबाबदारी पूर्ण कराल. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य मिळेल. योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. बुध-शुक्र अनुकूल आहेत. तुमची रेंगाळलेली कामे मार्गी लगतील. चिंता दूर होईल.

    मिथुन रास

    मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. राजकारणात नवीन डावपेच लढवावेत. स्पर्धा जाणवेल. प्रसंगावधान ठेवावे लागेल. संघर्ष टाळावेत. सुसंवाद साधून कामे करावीत. अधिकारांचा योग्य उपयोग करावा. आरोग्यकडे लक्ष द्यावे लागेल. धोका स्वीकारू नका. हेही दिवस जातील. पुढे प्रगती होईल.

    कर्क रास

    ग्रहमानाची विशेष मदत मिळणार नाही. मेहनतीवरच भर द्यावा लागेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. उधार उसनवारी टाळावी. मोठे आर्थिक व्यवहार जपून करावेत. वाटल्यास जाणकारांचा सल्ला घ्यावा. तब्बेतीवर कामांचा ताण पडेल. बेफिकीर राहू नये. महिलांनी गृहव्यवस्थापनेकडे जास्त लक्ष द्यावे.

    सिंह रास

    महत्त्वाची सर्व कामे पूर्वार्धात करून घ्या. मिथुनेचा सूर्य अनुकूल राहील. कामे यशस्वी होतील. बुध, गुरु व शुक्र शुभयोगात आहेत. सामंजस्य दाखवून प्रश्न सोडवाल. हितसंबंध सुधारतील. काही भाग्यवंतांना अनपेक्षित धनप्राप्ती होईल. आनंदवार्ता समजतील. प्रवास कार्यसाधक होतील. यशस्वी व्हाल.

    कन्या रास

    सूर्य, मंगळ, बुध, शुक्र व शनी प्रसन्न आहेत. कौटूंबिक प्रगती होईल. दैवाची मर्जी राहील. अर्थप्राप्ती चांगली होईल. त्यामुळे मनासारखा खर्च करू शकाल. आवडत्या छंदासाठी वेळ द्याल. आनंदवार्ता समजतील. आप्तेष्ट मित्रांच्य भेटीगाठी होतील. सुसंवाद साधून कामे कराल. इतरांना मदत कराल.

    तूळ रास

    १६ जुलैपासून कर्केचा सूर्य शुभयोगात येईल. बुध, गुरु व शुक्र अनुकूल आहेत. छान प्रगती होईल.कामे मार्गी लागतील. अर्थप्राप्ती होईल. खर्च योग्य कारणांसाठी कराल. आपला स्वभाव महत्त्वाकांक्षी राहील. अधिक मोठ्या यशासाठी प्रयत्न कराल. तुमची स्वप्ने साकार होतील. आरोग्यात छान सुधारणा होईल.

    वृश्चिक रास

    ग्रहमानाची विशेष मदत मिळणार नाही. मेहनतीवरच भर द्यावा लागेल. अनावश्यक खर्च टाळवा लागेल. बोलण्यापूर्वी विचार करावा. गैरसमज टाळावेत. इतरांच्या प्रश्नात मध्यस्थी करायला जाऊ नका. वेळेचा व संधींचा योग्य उपयोग करुन घ्या. द्विधा मन:स्थितीमुळे निर्णय घेणे कठीण जाईल. आरोग्यास जपावे.

    धनू रास

    महत्त्वाची कामे पूर्वार्धात करून घ्या. मिथुनेचा सूर्य १६ जुलै पर्यंत अनुकूल राहील. कामे यशस्वी होतील. ग्रहमान उत्तम आहे. प्रत्येक कार्यात यशस्वी व्हाल. योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. धार्मिक मंगल कार्यात भाग घ्याल. शरीरस्वास्थ्य राहील. मन:स्वास्थ्य मिळेल. आनंदवार्ता समजतील. मनोबल वाढेल.

    मकर रास

    स्वप्ने साकार होतील. कार्यक्षमता वाढवून कामांचा उरक ठेवाल. ग्रहमान चांगले आहे. मिळलेल्या संधीचे सोने कराल. सरकारी रेंगाळलेली कामे मार्गी लगतील. नवीन कार्याचा परिचय होईल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. मनोबल वाढविणार्‍या घटना घडतील. कलावंतांचा मुड लागेल.

    कुंभ रास

    १६ जुलैपासून कर्केचा सूर्य अनुकूल होईल. परिस्थितीत चांगली सुधारणा होईल. पूर्वींच्या चुका सुधारण्याची संधी मिळेल. कर्तृत्त्वाला संधीची जोड मिळेल. प्रसंगावधान दाखवाल. संयमाने वागाल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. समाधान वाटेल.

    मीन रास

    मंगळ, बुध आणि गुरु प्रसन्न आहेत. चिंता करू नका. सर्व गोष्टी अनुकूल घडतील. श्रद्धा व सबुरी ठेवा. अध्यात्मिक साधना यशस्वी होईल. मनाची एकाग्रता साधू शकाल. कलावंताना मानसन्मान प्राप्त होतील. राजकारणातील आपले डावपेच यशस्वी होतील. आरोग्य चांगले राहील.

    महिन्याचे राशीभविष्य - ऑगस्ट २०२३

    मेष रास

    १८ ऑगस्ट पासून कन्येचा मंगळ अनुकूल होईल. बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. नोकरी, उद्योग व्यवसायासंबंधी योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. व्यवहारी राहून बचतीकडे लक्ष द्याल. आरोग्य छान राहील. कामांची पूर्तता कराल.  समाधान प्राप्त होईल. महिलांना गृहसौख्य मिळेल.

    वृषभ रास

    महत्त्वाची कामे पूर्वार्धात करून घ्या. कर्केचा सूर्य पराक्रम स्थानी आहे. आपली कामे मार्गी लगतील. कौटुंबिक प्रश्न मोठ्या कौशल्याने सोडवाल. इतरांच्या मतांचा आदर कराल. सदविचारांची संगत लभेल. हातून सत्कार्ये घडतील. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. शरीरस्वास्थ्य राहील.

    मिथुन रास

    १७ ऑगस्ट पासून सिंहेचा सूर्य अनुकूल होईल. प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होईल. मनोबल वाढेल. कामात उत्साह वाटेल. परिस्थितीत छान सुधारणा होईल. अनपेक्षित लाभदायक घटना घडतील. गुरु-शुक्र प्रसन्न आहेत. आरोग्यात सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.

    कर्क रास

    मंगळ, बुध व शुक्र तुमच्यासाठी नवीन संधी आणतील. नैराश्य निघून जाईल. वेळेचा छान उपयोग कराल. आपली कृती इतरांना प्रेरणा देईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. सुसंवाद साधून लोकांना मदत कराल. आरोग्यावरचा ताणतणाव दूर होईल. विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये भाग घ्यावा. यश मिळेल.

    सिंह रास

    मेषेचा गुरु भाग्यस्थानी आहे. तो तुम्हास नक्कीच मदत करील. नवीन आव्हाने स्वीकारून ती यशस्वी करून दाखवाल. अर्थप्राप्ती होईल. तसा खर्चही वाढेल. कर्तव्यपूर्तीसाठी वेळ खर्च कराल. कलावंत, क्रीडापटू यांना मान-सन्मान मिळेल. उद्योग व्यवसायातील प्रश्न सुटतील. शरीरस्वास्थ्य मिळेल.

    कन्या रास

    महत्त्वाची कामे पूर्वार्धात करून घ्या. कर्केचा सूर्य लाभस्थानी आहे. तो मदत करील. आर्थिक प्रश्न सुटतील. मोठ्या लोकांच्या भेटीगाठी होतील. अनपेक्षित लाभ होतील. महिलांना मौल्यवान वस्तुंची खरेदी करता येईला. मुलांकडून प्रगतीच्या बातम्या समजतील. विद्यार्थ्यांना अध्ययनात यश मिळेल.

    तूळ रास

    ग्रहमान उत्तम आहे. दैव अनुकूल आहे. सूर्य, मंगळ, बुध, गुरु व शुक्र तुमची स्वप्ने साकार करतील. प्रत्येक काम यशस्वी होईल. आनंद वाटेल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. अर्थप्राप्ती चांगली होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. मनावरचा ताणतणाव दूर होईल. शरीरस्वास्थ्य लभेल.

    वृश्चिक रास

    १७ ऑगस्टपासून सिंहेचा सूर्य कर्मस्थानी शुभयोगात येईल. तो परिस्थिती अनुकूल करील. विरोधकांचा विरोध मावळेल. मार्गातील अडथळे दूर होतील. मनातील नैराश्य दूर होईल. कार्यतत्परता दाखवाल. इतरांची मने जिंकून घ्याल. आरोग्यात सुधारणा होईल. इतरांना दिलेला शब्द पाळाल.

    धनू रास

    मेषेचा गुरु पंचमस्थानी शुभयोगात आहे. कुंभेचा शनी पराक्रम स्थानी आहे. त्यामुळे छान प्रगती होईल. नवीन संधी प्राप्त होतील. यश मिळेल. सरकारी कोर्टकचेरीची कामे मार्गी लगलीत. महिलांना हे दिवस सौख्याचे असतील. बचतीकडे लक्ष द्याल. आरोग्यात सुधारणा होईल. उत्साह वाढेल.

    मकर रास

    महत्त्वाची कामे पूर्वार्धात करून घ्या. कर्केचा सूर्य सप्तमस्थानी आहे. बुध-शुक्र ही शुभयोगात आहेत. चिंता करू नका. हितसंबंध सुधारतील. प्रसंगावधान दाखवाल. आपले अंदाज खरे ठरतील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये यश मिळेल. सुसंवाद साधून कामे करण्यावर भर द्याल.

    कुंभ रास

    कर्क-सिंह राशीतला सूर्य तेवढा अनुकूल आहे. बाकी ग्रहमान अनुकूल नाही. मेहनतीत वाढ करावी लगेल. प्रयत्नात सातत्य ठेवावे लगेल. अर्थप्राप्ती झाली तरी खर्च खूप होईल. अनावश्यक खर्च टाळावा लागेल. कामात वाढ होईल. आरोग्यावर ताण जाणवेल. द्विधा मन:स्थिती राहील.

    मीन रास

    १७ ऑगस्टपासून सिंहेचा सूर्य मदत करील. परिस्थितीत अनुकूल बदल होतील. मेषेचा गुरु धनस्थानी विराजमान झालेला आहे. तो प्रगतीसाठी मदत करील. नोकरीत वरीष्ठांची मर्जी राहील. उद्योग व्यवसायातील गुंतणुकीवर चांगला फायदा होईल. आरोग्यात सुधारणा होईल. विद्यार्थ्यांना अध्यनात यश मिळेल.

    महिन्याचे राशीभविष्य - सप्टेंबर २०२३

    मेष रास

    १७ सप्टेंबर पासून कन्येचा सूर्य शुभयोगात येईल. कुंभेचा शनी लाभस्थानी अनुकूल आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. स्वप्ने साकार होतील. नवीन ओळखी होतील. प्रसंगावधान दाखवाल. कर्तृत्त्वाने इतरांची मने जिंकाल. अधिकार प्राप्तीचे योग येतील. मनींचा संभ्रम दूर होईल. अर्थप्राप्ती होईल. आरोग्यात सुधारणा होईल.

    वृषभ रास

    बुध-शुक्र थोडी फार मदत करतील. श्रद्धा व सबुरी ठेवावी लागेल. इतरांना दिलेला शब्द पाळाल. पत-प्रतिष्ठा वाढीस लागेल. नवीन आव्हाने स्वीकारावी लागतील. धार्मिक मंगल कार्यात भाग घ्याल. राहत्या घराविषयीचे प्रश्न सुटतील. आपला स्वभाव महत्त्वाकांक्षी राहील. आरोग्याची साथ मिळेल.

    मिथुन रास

    महत्त्वाची कामे पूर्वार्धात करून घ्या. सिंहेचा सूर्य अनुकूल आहे. कामे यशस्वी होतील. मेषेचा गुरु धनस्थानी आहे. अर्थप्राप्ती चांगली हाताळल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. आनंदवार्ता समजतील. मनावरचा ताण दूर होईल. संयमाने वागाल. कर्केचा शुक्रही शुभयोगात आहे. आरोग्यात सुधारणा होईल.

    कर्क रास

    १७ सप्टेंबर पासून कन्येचा सूर्य पराक्रम स्थानी शुभयोगात येईल. कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील. उद्योग व्यवसायात अधिक गुंतवणूक करण्याची संधी प्राप्त होईल. प्रिय घटना घडतील. तुमची कृती इतरांना प्रेरणा देईल. वेळेचा छान उपयोग कराल. स्पर्धा जिंकाल.

    सिंह रास

    मेषेचा गुरु भाग्यस्थानी विराजमान आहे. सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतील. कर्केचा शुक्रही अनुकूल आहे. दैवाची मर्जी राहील. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. परंतु पुढे फायदा होईल. उद्योग व्यवसायात अधिक गुंतवणूक कराल. शरीरस्वास्थ्य चांगले राहील.

    कन्या रास

    शुक्र-शनी अनुकूल आहेत. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. सुसंवाद साधून कामे करण्यावर भर द्याल. अधिकारांचा योग्य उपयोग कराल. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास हेही दिवस चांगले जातील. कार्यक्षमता वाढवावी लागेल. परिणामांचा विचार करुन कृती करावी. आरोग्य ठीक राहील.

    तूळ रास

    महत्त्वाची कामे पूर्वार्धात करा. ती यशस्वी होतील. सिंहेचा सूर्य धनस्थानी शुभयोगात आहे. मेषेचा गुरु सप्तमस्थानी अनुकूल आहे. विवाहेच्छुकांचे विवाह जमतील. आनंदवार्ता समजतील. कौटुंबिक प्रश्न सुटतील. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य चांगले राहील. यशस्वी व्हाल.

    वृश्चिक रास

    सूर्य, मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. मनावरचा ताणतणाव दूर होईल. अंतिम विजय तुमचाच असेल. वेळेचा व संधींचा योग्य उपयोग करून घ्याल. सामंजस्य दाखवून कामे कराल. हितसंबंध सुधारतील. महिलांना गृहव्यवस्थापनेत छान यश मिळेल. आनंदवार्ता समजतील.

    धनू रास

    १७ सप्टेंबर पासून कन्येचा सूर्य मदत करील. व्यवहारातील कोडी उलगडतील. दुकानदारी, दलाली, शेअर्स खरेदी-विक्री यात फायदा होईल. अर्थप्राप्ती होईल. परंतु खर्चही वाढेल. परंतु तो योग्य कारणांसाठी होईल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. कामात उत्साह राहील. दिवस चांगले जातील.

    मकर रास

    मेहनतीवरच भर द्यावा लगेल. ग्रहमानाची मदत मिळणार नाही. संयम, सावधानता आणि सहनशीलता ठेवावी लागेल. स्वावलंबी व्हाल. कलासाधनेत आनंद प्राप्त होईल. कामात वाढ होईल. त्याचा आरोग्यावर ताण पडेल. मन:स्वास्थास जपावे लागेल. व्यवहारी राहून बचतीकडे लक्ष द्यावे.

    कुंभ रास

    महत्त्वाची कामे १७ सप्टेंबर पर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. इतर ग्रहमान अनुकूल नाही. प्रयत्नात सातत्य ठेवावे लागेल. परिणामांचा विचार करून कृती करावी. संयमाने वागावे. संघर्ष टाळणे हिताचे होईल. प्रवासात वेळेचे व मौल्यवान वस्तुंचे भान ठेवावे. आरोग्यास जपावे.

    मीन रास

    ग्रहमान उत्तम आहे. सूर्य, बुध, गुरु आणि शुक्र तुमची स्वप्ने साकार करतील. प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होतील. नोकरीत वरीष्ठांची मर्जी राहील. आर्थिक गुंतवणूकीवर चांगला फायदा होईल. आवडत्या छंदासाठी अधिक वेळ देऊ शकाल. इतरांशी हितसंबंध सुधारतील. यशस्वी व्हाल.

    महिन्याचे राशीभविष्य - ऑक्टोबर २०२३

    मेष रास

    सूर्य, मंगळ व शनी अनुकूल आहेत. अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. २८ ऑक्टोबरचे चंद्रग्रहण अनिष्ट असले तरी चिंता करू नये. तब्बेतीवरचा ताणतणाव दूर होईल. प्रसंगावधान दाखवावे लागेल. महिलांना गृहव्यवस्थापनेत यश मिळेल.

    वृषभ रास

    १७ ऑक्टो. पासून तूळेचा सूर्य अनुकूल होईल. परिस्थितीत चांगला बदल घडेल. मंगळ, बुध व शुक्र तुमची स्वप्ने साकार करण्यात मदत करतील. २८ ऑक्टो. चे चंद्रग्रहण अनुकूल नाही. तरी चिंता नको. इतर ग्रहमानाची मदत मिळेल. सुसंवाद साधून कामे करावीत. यशस्वी व्हाल.

    मिथुन रास

    २८ ऑक्टो. चे चंद्रग्रहण मिथुन राशीसाठी शुभ आहे. अनपेक्षित लाभ देणार्‍या घटना घडतील. बुध, गुरु व शुक्र ही मदत करतील. आर्थिक येणे वसूल होईल. आप्तेष्ट मित्रांशी हितसंबंध सुधारतील. कल्पकता दाखवून कामे कराल. इतरांची शाबासकी मिळेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल.

    कर्क रास

    कन्येचा सूर्य पूर्वार्धात मदत करील. २८ ऑक्टो. चे चंद्रग्रहण शुभफल देणारे आहे. लाभदायक घटना घडतील. आर्थिक लाभ होतील. उद्योग व्यवसायांतील तुमचे अंदाज खरे ठरतील. योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. सामाजिक कार्यात भाग घ्याल  आरोग्यात सुधारणा होईल.

    सिंह रास

    २८ ऑक्टोबर चे चंद्रग्रहण मिश्रफल देणारे आहे. अर्थप्राप्ती झाली तरी खर्च खूप होईल. १७ ऑक्टो. पासून तूळेचा सूर्य अनुकूल होईल. कर्तबगारी दाखविण्याची संधी प्राप्त होईल. आवडत्या छंदासाठी वेळ खर्च कराल. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील. कामात उत्साह राहील. अध्ययन छान चालेल.

    कन्या रास

    बुध, शुक्र व शनी प्रसन्न राहतील. २८ ऑक्टो. चे चंद्रग्रहण अनुकूल नाही. चिंता करण्याचे कारण नाही. ग्रहमान चांगले आहे. प्रगतीचा वेग असाच चालू राहील. कर्तव्यपूर्तीसाठी वेळ व पैसे खर्च कराल. आनंद व समाधान वाटेल. प्रिय भेटीगाठी होतील. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा. यश मिळेल.

    तूळ रास

    २८ ऑक्टोबर चे चंद्रग्रहण मिश्रफल देणारे आहे. अर्थप्राप्ती झाली तरी खर्च खूप होईल. बुध, गुरु व शुक्र शुभयोगात आहेत. नवीन ओळखी होतील. प्रवासयोग येतील. वेळेचे भान ठेवावे लागेल. सुसंवाद साधाल. आरोग्यात सुधारणा होईल. विद्यार्थ्यांना अध्यनात यश मिळेल.

    वृश्चिक रास

    २८ ऑक्टोबर चे चंद्रग्रहण वृश्चिक राशीसाठी शुभ फल देणारे आहे. अनपेक्षित लाभ होतील. कन्येचा सूर्य १७ आक्टोबर पर्यंत अनुकूल राहील. कार्यक्षमता वाढेल. बुध-शुक्र शुभयोगात आहेत. जबाबदारीची कामे पार पडतील. इतरांची शाबासकी मिळवाल. आरोग्यात सुधारणा होईल.

    धनू रास

    २८ ऑक्टोबर चे चंद्रग्रहण मिश्रफल देणारे आहे. जमाखर्चाची स्पर्धा राहील. सुसंवाद साधून कामे करावी लागतील. संघर्ष टाळावा लागेल. सूर्य, मंगळ, बुध, गुरु व शनी अनुकूल आहेत. प्रत्येक कामात यश मिळेल. अर्थप्राप्ती होईल. राहत्या घराविषयीचे प्रश्न सुटतील. आरोग्य ठीक राहील.

    मकर रास

    २८ ऑक्टोबरचे चंद्रग्रहण अनुकूल नाही. १७ ऑक्टोबर पासून तूळेचा सूर्य अनुकूल होईल. बुध-शुक्र प्रसन्न आहेत. हाती घेतलेले उपक्रम पूर्ण कराल. विरोधकांचा विरोध मावळेल. स्पर्धा-पैजा जिंकू शकाल. आप्तेष्ट मित्रांच्या भेटीगाठी होतील. हितसंबंध सुधारतील.

    कुंभ रास

    २८ ऑक्टोबर चे चंद्रग्रहण कुंभ राशीसाठी शुभ आहे. आनंददायक घटना घडतील. अर्थप्राप्ती होईल. खर्च मनासारखा करु शकाल. कामात वाढ होईल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. इतरांचे सहकार्य मिळेल. जास्त अपेक्षा न करणे चांगले. हेही दिवस प्रगतीचे ठरतील.

    मीन रास

    २८ ऑक्टो. चे चंद्रग्रहण मिश्रफल देणारे आहे. कन्येचा सूर्य १७ ऑक्टो. पर्यंत मदत करील. बुध, गुरु व शुक्र शुभयोगात आहेत. वेळेचा व संधींचा छान उपयोग कराल. महिलांना मौल्यवान वस्तूंची खरेदी करता येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा जिंकता येईल.

    महिन्याचे राशीभविष्य - नोव्हेंबर २०२३

    मेष रास

    महत्त्वाची कामे १६ नोव्हें. पर्यंत करून घ्या. तूळेचा सूर्य अनुकूल आहे. कामे यशस्वी होतील. बुध व शनी शुभयोगात आहेत. अर्थप्राप्ती चांगली होईल. मनासारखा खर्च करू शकाल. महिलांना गृहव्यवस्थापनात यश येईल. इतरांची मने न दुखावता प्रश्न सोडवता येतील. आरोग्य चांगले राहील.

    वृषभ रास

    सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र शुभयोगात आहेत. प्रवास कार्यसाधक होतील. मनींच्या इच्छा पूर्ण होतील. कर्तव्यपूर्तींसाठी वेळ व पैसे खर्च कराल. हिंमत दाखवाल. जिद्दीने यश संपादन कराल. नवीन ओळखी होतील. आरोग्यात छान सुधारणा होईल. कामात उत्साह राहील. आनंद वाटेल.

    मिथुन रास

    ग्रहमान उत्तम आहे. जे कार्य हाती घ्याल ते यशस्वी करून दाखवाल. १६ नोव्हें पासून वृश्चिकेचा सूर्य अनुकूल होईल. कार्यतत्परता दाखवून इतरांची मने जिंकाल. अर्थप्राप्ती चांगली होईल. इतरांचे देणे फेडाल. मनावरचा ताण हलका होईल. शरीरस्वास्थ्य राहील. उत्साह राहील.

    कर्क रास

    बुध-शुक्र तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. चिंता करू नका. प्रयत्नात सातत्य ठेवा. यश तुमचेच असेल. राजकारणातील डावपेच यशस्वी होतील. विरोधक माघार घेतील. अधिकारांचा योग्य वापर कराल. इतरांचे लक्ष वेधून घ्याल. प्रिय घटना घडतील. आरोग्य चांगले राहील.

    सिंह रास

    महत्त्वाची कामे पूर्वार्धात करून घ्या. तूळेचा सूर्य पराक्रम स्थानी आहे. दैवाची मदत होईल. बुध, गुरु व शुक्र शुभयोगात आहेत. कामे मार्गी लागतील. मनोबल वाढविणार्‍या घटना घडतील. यशस्वी व्हाल. स्पर्धा-पैजा जिंकाल. व्यवहारी राहाल. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील.

    कन्या रास

    १६ नोव्हेंबर पासून वृश्चिकेचा सूर्य अनुकूल होईल. संघर्ष टाळून कामे करून घेण्यात यशस्वी व्हाल. मंगळ, बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. छान यश मिळेल. धाडसी कृती कराल. आर्थिक लाभ होतील. दूरदृष्टी ठेवून निर्णय घ्यावेत. कायदे कानून यांचे पालन करावे. यश मिळेल.

    तूळ रास

    बुध, गुरु व शुक्र शुभयोगात आहेत. मनावरचा ताणतणाव दूर होईल. सुसंवाद साधाल. वेळेचे महत्त्व जाणाल. संधींचा शोध घ्याल. यशस्वी व्हाल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न व आनंददायक राहील. महिलांना स्वत:ची प्रगती साधता येईल. दैवाची अनुकूलता लाभेल. अध्ययनात यश मिळेल.

    वृश्चिक रास

    ग्रहमानाची विशेष मदत मिळणार नाही. बुध-शुक्र थोडी फार मदत करतील. परंतू मेहनतीवरच भर द्यावा लागेल. प्रयत्नात सातत्य ठेवाव लागेल. तुमची द्विधा मन:स्थिती राहील. निर्णय घेणे कठीण होईल. कामात वाढ होईल. आरोग्यावर ताण पडेल. दक्षता घ्यावी लागेल.

    धनू रास

    महत्त्वाची कामे १६ नोव्हें. पर्यंत करून घ्या. तूळेचा सूर्य अनुकूल राहील. कामे मार्गी लागतील. मंगळ, बुध, गुरु, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. आर्थिक प्रगती होईल. वेळेचा व संधीचा योग्य उपयोग कराल. धार्मिक मंगल कार्यात भाग घ्याल. तुम्ही इतरांना मदत कराल. आरोग्य छान राहील.

    मकर रास

    सूर्य, मंगळ, बुध व शुक्र तुमच्यासाठी शुभयोगात आहेत. हाती घेतलेले कार्य यशस्वी कराल. कामात यश मिळेल. कौटुंबिक प्रश्न कौशल्याने सोडवाल. व्यवसाय उद्योगात अधिक गुंतवणूक कराल. अपेक्षेप्रमाणे अंदाज खरे ठरतील. तब्बेतीच्या तक्रारी दूर होतील.

    कुंभ रास

    सूर्य, मंगळ, बुध व शुक्र प्रसन्न आहेत. प्रश्न सुटतील. मनावरचा ताणतणाव दूर होईल. इतरांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. नवीन कार्यक्षेत्रांशी परिचय होईल. इतरांना दिलेला शब्द पाळाल. पत-प्रतिष्ठा वाढीस लागेल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. उत्साह वाटेल.

    मीन रास

    परिस्थिती चांगली राहील. बुध, गुरु व शुक्र मदत करतील. नोकरी व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. तुमचे अंदाज खरे ठरतील. यशाची खात्री पटेल. महिलांना हे दिवस खूप स्वास्थ्याचे जातील. सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील. आरोग्य छान राहील.

    महिन्याचे राशीभविष्य - डिसेंबर २०२३

    मेष रास

    प्रयत्नात सातत्य ठेवावे लागेल. मेहनत वाढवावी लागेल. कुंभेचा शनी वगळता इतर ग्रहमान अनुकूल नाही. संघर्ष टाळावा लागेल. सामंजस्य दाखवावे लागेल. संयम सहनशीलता आणि सावधानता ठेवावी लागेल. तुमचे हे ही दिवस चांगले जातील. वर्षा अखेर तुमची बचत वाढलेली असेल.

    वृषभ रास

    महत्त्वाची कामे १६ डिसेंबर पूर्वी करून घ्या. वृश्चिकेचा सूर्य मदत करील. कामे यशस्वी होतील. आर्थिक येणे वसूल होईल. या महिन्यात खर्च खूप वाढणार आहे. अनावश्यक खर्च टाळावा लागले. बचतीकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. कामात वाढ होईल. मन:स्वास्थ्यास जपावे लागले.

    मिथुन रास

    सूर्य, मंगळ, बुध, गुरु व शुक्र शुभयोगात आहेत. दैवाची मदत मिळेल. पूर्वींच्या चुका सुधारण्याची संधी मिळेल. आपले अंदाज खरे ठरतील. व्यवसाय उद्योगात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. परिणमांचा विचार करून कृती कराल. शरीरस्वास्थ्य राहील.

    कर्क रास

    १६ डिसेंबर पासून धनूचा सूर्य शुभोगात येईल. मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. समयसूचकता दाखवाल. कर्तव्यपूर्तीसाठी वेळ व पैसे खर्च कराल. समाधान वाटेल. मुलांकडून आनंदवार्ता समजतील. आरोग्य चांगले राहील. मन:स्वास्थ्य मिळेल. यश येईल.

    सिंह रास

    बुध, गुरु व शुक्र अनुकूल आहेत. तुमची कामे मार्गी लागतील. नवीन जबाबदार्‍या स्वीकाराव्या लागतील. इतरांना मदत करावी लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील.  कौटुंबिक प्रश्न सुटतील. महिलांना कलाक्षेत्रात प्रगती साधता येईल. बचतही करता येईल. स्पर्धेमध्ये अवश्य भाग घ्या. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

    कन्या रास

    महत्त्वाची कामे पूर्वार्धात करून घ्या. वृश्चिकेचा सूर्य १६ डिसेंबर पर्यंत मदत करील. व्यवहार कौशल्य दाखवाल. उद्योग व्यवसायातील मागचे येणे वसूल होईल. समाधान प्राप्त होईल. महिलांना आनंद वार्ता समजतील. धार्मिक मंगल कार्यात भाग घ्याल. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य चांगले राहील. काहींना अनपेक्षित लाभ होतील.

    तूळ रास

    १६ डिसेंबरपासून धनूचा सूर्य पराक्रम स्थानी शुभयोगात येईल. नवीन कामे स्वीकारून ती यशस्वी करून दाखवाल. प्रगतीसाठी संधी उपलब्ध होतील. मंगळ, बुध, गुरु व शुक्र. अनुकूल आहेत. प्रत्येक निर्णय योग्य घ्याल. इतरांची शाबासकी मिळवाल. नोकरीत प्रगतीसाठी संधी मिळेल. आरोग्य चांगले राहील.

    वृश्चिक रास

    ग्रहमानाची विशेष मदत नाही. मेहनतीवरच भर द्यावा लगेल. सावधानता ठेवावी लागेला. श्रद्धा व सबुरी हा मंत्र ध्यानी ठेवावा. प्रलोभनांपासून दूर रहावे. कर्तृत्त्व दाखविण्यासाठी संधींचा शोधा घ्यावा. द्विधा मन:स्थिती राहील. महिलांनी अनावश्यक खर्चावर मर्यादा घालावी. आरोग्यावर ताण जाणवेल.

    धनू रास

    मेषेचा गुरु आणि कुंभेचा शनी धनू राशीसाठी शुभयोगात आहेत. चिंता करण्याची गरज नाही. प्रगतीचा वेग असाच सुरु राहील. नोकरी व्यवसायात अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. मनावरील ताणतणाव दूर होतील. प्रवास कार्यासाधक होतील. आवडत्या छंदासाठी वेळ द्याल. आरोग्य छान राहील.

    मकर रास

    महत्त्वाची कामे पूर्वार्धात करून घ्या. वृश्चिकेचा सूर्य लाभस्थानी आहे. प्रश्न सुटतील. मनोबल वाढेल. मंगळ, बुध, शुक्र शुभयोगात आहेत. तुमचे निर्णय योग्य असतील. जिद्दीने सर्व गोष्टी कराल. प्रवास मनाजोगे व आनंददायी होतील. जमीन खरेदी-विक्री व्यवहारात लाभ होतील. आरोग्य चांगले राहील. स्पर्धा जिंकाल.

    कुंभ रास

    सूर्य, बुध व शुक्र प्रसन्न आहेत. इतरांना दिलेली आश्वासने पाळावी लागतील. खर्च वाढला तरी तो योग्य कारणांसाठी होईल. आपले विचार इतरांना प्रेरणा देतील. कायदे कानून यांचे पालन कराल. चांगल्या मित्रांची संगत लाभेल. आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील. कलावंत, क्रीडापटू, लेखक यांना मानसन्मान प्राप्त होतील.

    मीन रास

    उत्तरार्धात आनंददायक घटना घडतील. १६ डिसेंबर पासून धनूचा सूर्य कर्म स्थानी शुभयोगात येईल. प्रिय घटना घडतील. बुध, गुरु व शुक्र अनुकूल आहेत. विवाहेच्छुकांना आनंदवार्ता समजतील. अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. समाजकार्यात भाग घ्याल. इतरांना मदत कराल. आरोग्य चांगले राहील.

    Visit Us On FacebookVisit Us On InstagramVisit Us On Twitter