योग तीन स्तरांवर काम करते ज्यामुळे तुमच्या शरीराला अधिक फायदा मिळतो. योग्य स्वरूपात आणि योग्य प्रकारे योग करणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. योगासनाचे (Yogasan Marathi) नक्की काय फायदे आहेत जाणून घ्या –
- पहिल्या चरणामध्ये योग मनुष्याला स्वास्थ्यवर्धक बनवते आणि त्यामध्ये ऊर्जा भरण्याचे काम करते.
- दुसर्या चरणामध्ये योगा हे मस्तिष्क आणि विचारांवर परिणाम करते. आपल्यातील नकारात्मक विचार असतात, जे आपल्याला तणाव आणि चिंता देतात अथवा आपल्या आयुष्यात मानसिक विकारांसाठी प्रवृत्त ठरतात. योग या चक्रातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी फायदेशीर ठरते.
- तर तिसर्या आणि सर्वात महत्त्वपूर्ण चरणामध्ये पोहचून मनुष्य सर्व चिंतापासून मुक्त होतो. योगाच्या या अंतिम चरणापर्यंत पोहचण्यासाठी कठीण परिश्रमाची गरज असते. या प्रकाराच्या योगाचे फायदे हे विविध स्तरावर तुम्हाला पाहायला मिळतात.
नियमित योगा करण्याचे फायदे
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा हा अत्यंत योग्य उपाय आहे. नियमित योगा केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढतं.
- ताणतणावपासून मुक्ती – आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच तणाव असतो. पण नियमित योगा केल्यास, या ताणतणावपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. तुम्ही सकाळी उठून रोज प्राणायाम आणि मेडिटेशन करत असाल तर तुम्हाला पूर्ण दिवस एनर्जी मिळते आणि तुमच्यामध्ये उत्साह कायम राहतो.
- शरीरातील साखरेवर नियंत्रण – आजकाल लहान वयातदेखील लोकांना मधुमेह झालेला ऐकायला मिळतो. शरीरामधील इन्सुलीनचं प्रमाण घटलं की, साखरेचं प्रमाण वाढतं. मात्र रोज योगा केल्यामुळे साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
- वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी – आजकाल खाण्याच्या पद्धती इतक्या बदलल्या आहेत की, त्याचा परिणाम शरीर लठ्ठ होण्यावर होत असतो. बर्याच जणांना ही समस्या असते. पण योगा केल्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहातं. योगामध्ये अशी अनेक आसनं आहेत ज्यामुळे तुमची पचनक्रिया योग्य राहते आणि तुमच्या शरीरामध्ये चरबी साठू शकत नाही.
- रक्ताभिसरण चांगलं होतं – योगामुळे शरीरातील रक्ताभिसरण वेगाने होण्यास मदत होते. शिवाय सर्वच अवयवांना योग्य व्यायाम मिळतो. यामुळे श्वासोच्छवास योग्य तर्हेने घेतला जातो आणि रक्ताभिसरण प्रक्रिया अप्रतिम होते.
- म्हातारपणात आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी – तरूणपणी शरीर आपल्याला योग्य साथ देत असतं. कारण त्यावेळी कितीही आजार आला तरीही प्रकृती साथ देते. पण जसं वय वाढतं तशा तक्रारीही वाढतात. शरीरावरही मर्यादा येतात. त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासूनच जर योगा करत असाल तर तुम्हाला म्हातारपणात आरोग्याच्या कमी समस्यांना सामोरं जावं लागतं.
योगा करण्याची योग्य पद्धत
ध्यान (Meditation)
ध्यानधारणा करणे हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. काही मिनिट्स तुम्ही ध्यान लावून बसलात की, तुमच्या मन आणि शरीरामध्ये शक्तीचा संचार होतो. सकाळीच ध्यान केल्यामुळे तुमचं मन एका विशिष्ट दिशेने कार्यरत राहतं. तसंच पूर्ण दिवस तुमचं मन एकाग्र, शांत आणि संतुलित राहतं.
नाडी शोधन प्राणायम
(Anulom Vilo)
आपल्या शरीरातील अशुद्धी दूर करण्यासाठी योगामध्ये नाडी शोधन प्राणायम करण्यात येतं. प्राणायमप्रमाणेच यामध्ये दीर्घ श्वास घेऊन सोडायचा असतो. हा योगप्रकार अनुलोम – विलोम या नावानेदेखील ओळखला जातो. अनुलोम विलोमचे फायदे शरीराला मिळतात. शरीरासाठी अतिशय फायदेशीर असं हे प्राणायाम आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवण्याचं कसब येते.
शलभासन (Shala bhasana)
बर्याच व्यक्तींना पाठ आणि कमरेचा खूपच त्रास असतो; विशेषत: महिलांना गरोदरपणानंतर तर हा त्रास सर्रास होतो. या आसनामुळे तुमच्या कंबर आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात. शिवाय तुमच्या पाठीमध्ये आणि कंबरेत कोणत्याही स्वरूपाचा त्रास होत असेल तर हे आसन तुम्ही रोज करायला हवं. हे रोज करून तुम्हाला स्वत:लाच स्वत:मधील बदल जाणवेल.
भुजंगासन (Bhujan gasana)
तुमची छाती आणि तुमच्या शरीरातील मांसपेशी लवचिक बनवण्यासाठी आणि कंबरेत आलेला तणाव दूर करण्यासाठी हे आसन अप्रतिम आहे. मेरूदंडसंबंधित आजारी व्यक्तींनी हे आसन केल्यास, त्याना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. शिवाय महिलांमध्ये गर्भाशयातील रक्ताभिसरण प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठीदेखील या आसनाची मदत होते. तुमच्या मेंदूचे कार्य सुरळीत चालणेही गरजेचे असते. त्यामुळे तुमची स्मरणशक्ती चांगली राहते.
अर्धचक्रासन
(Ardha Chandrasana)
तुम्हाला मधुमेह अथवा साखरेचा कोणताही आजार वा पोटावरील चरबीपासून सुटका हवी असेल तर अर्धचक्रासन हा उत्कृष्ट पर्याय आहे. याबरोबर हेदेखील लक्षात ठेवा की, ज्या व्यक्तींना हाडासंबंधी कोणतीही गंभीर तक्रार असेल, त्या व्यक्तींनी हे आसन अजिबात करू नये आणि ज्या व्यक्तींना रक्तदाब अथवा मानसिक कोणताही आजार असेल त्यांनीही या आसनापासून दूरच राहावं. केवळ मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो.
योगाचे महत्त्व काय आहे
योगा खरंतर प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचं आहे. हा केवळ एक व्यायामाचा प्रकार नाही तर, यामुळे तुमच्या शरीराला एक योग्य कसरत होते. सध्याच्या धावपळीच्या जीवनात बाकी सगळं मिळतं पण आपण स्वत:च्या शरीराकडे अर्थात आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहोत. व्यायामाचे, योगाचे आपल्या आयुष्यात खूपच महत्त्व आहे. रोज योगा केल्याने ताणतणावपासून दूर राहतो. इतकंच नाही तर माणसाचे वजन, हाडं, मांसपेशी आणि सांधेदेखील दणकट राहातात. योगामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. शिवाय तुम्ही नियमित योगा केलात तर कोणत्याही आजारापासून तुम्ही दूर राहू शकता. पण त्यासाठी तुम्हाला ही गोष्ट नियमित करणं आवश्यक आहे. योगामुळे रक्तदाबदेखील नियंत्रणात राहातो. त्यामुळे योगा हा बर्याचशा आजारांना दूर ठेवतो जे जास्त महत्त्वाचं आहे.