धनत्रयोदशी संबंधी खुलासा – आश्विन कृष्ण त्रयोदशी प्रदोषकाळी असेल त्या दिवशी धनत्रयोदशी होते. यावर्षी शनिवार २२ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ०६.०२ मि. आश्विन कृष्ण त्रयोदशी प्रारंभ होत असून रविवार २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०६.०३ मि. समाप्त होत आहे. २२ ऑक्टोबर रोजी सायं. ०६.०२ मि .नंतर ज्या गावी सूर्यास्त होत असेल त्या गावी शनिवार २२ ऑक्टोबर रोजी प्रदोष व धनत्रयोदशी आहे. मात्र २३ ऑक्टोबर रोजी सायं. ६.०३ पूर्वी ज्या गावात सूर्यास्त होत असेल त्या गावी रविवार २३ ऑक्टोबर रोजी प्रदोष व धनत्रयोदशी आहे.
(१) शनिवार २२ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी असलेली गावे – मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, संपूर्ण कोकण, गोवा, गुजरात, बेळगाव, मंगळूर या भागात शनिवार २२ ऑक्टोबर रेाजी धनत्रयोदशी आहे.
(२) रविवार २३ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी असलेली गावे – नागपूर, सोलापूर, अकोला, अमरावती, अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगांव, जालना, धुळे, नांदेड, परभणी, भुसावळ, लातूर, यवतमाळ, वर्धा, विजापूर, विदर, गुलबर्गा, हुबळी, धारवाड, दिल्ली येथे रविवार २३ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे.