•   
  • संपर्क – +९१ ०२२-35578528    

  •     इमेल – sainirnay.images@gmail.com      

  • ओळख

    ॅनड्रॉइड, गॅझेट, टॅब्लेट्‌स, नोटपॅड या डिजिटल्स्‌च्या क्रांतीकारी युगात पंचाग दिनदर्शिकेचा व्यवसाय जोमाने सुरु आहे. दरवर्षाr असंख्य दिनदर्शिका बाजारात येतात, पण त्यातल्या काही निवडकच दिनदर्शिका लोकांच्या पसंतीस उतरतात. या निवडक दिनदर्शिकांमध्ये आपली लोकप्रियता सातत्याने टिकवून आहे ती म्हणजे साईनिर्णय” पंचाग दिनदर्शिका. गेली २५ वर्षे ही दिनदर्शिका प्रकाशित होत आहे. उत्कृष्ठ पेपर छपाई आणि दर्जेदार रंगसंगतीमुळे ही दिनदर्शिका अधिकाधिक लोकप्रिय होते आहे.

    इमेजेस प्रकाशित आणि महेश खर्द संपादीत साईनिर्णय” ही पंचाग दिनदर्शिका सर्व स्तरातून लोकप्रिय असून मराठी सह हिंदी, इंग्रजी, गुजराती या भाषांमध्येही उपलब्ध आहे. भिंतीवरील रेग्युलर साईज, कार कॅलेंडर, ऑफिस, आणि टेबल या आकारात प्रकाशित झालेल्या या दिनदर्शिकेला उत्तम मागणी आहे.

    २००१ साली प्रथम प्रकाशित झालेल्या साईनिर्णय” या पंचाग दिनदर्शिकेचे उत्फूर्त स्वागत झाले होते.साईनिर्णय” इमेजेसचे संपादक गेली बरीच वर्षे प्रिंटीगच्या व्यवसायात कार्यरत आहेत. साधारणत: पंधरा ते सोळा वर्षांपासून साईबाबांची टेबल कॅलेंडरर्स प्रकाशित करण्यास सुरूवात केली.

    महाराष्ट्रातील सुप्रसिध्द पंचागकर्ते श्री. दा.कृ.सोमण हे पहिल्या वर्षांपासून “साईनिर्णय” करिता पंचाग लिहित आहेत. त्यांचे या विषयातील प्रभुत्व सर्वश्रृत आहेत. “साईनिर्णय” चे वैशिष्टय म्हणजे दैनंदिन पंचाग, वार, तिथी, नक्षत्र, चंद्रराशी, यात्रा, महत्वाचे सण व दिवस, या सारखी माहिती तर आहेच तसेच मासिक भविष्य, हवामानाचा अंदाज, चंद्र – सूर्य ग्रहणे, साखरपुडा – विवाह – वास्तू – मुंजीचे मुहूर्त, याचा देखील समावेश असतो., आरोग्य, पाककृती, साहीत्य, विशेष व्यक्तींची ओळख, कायदेविषयक माहिती, सणांविषयीची माहिती, सांस्कृतीक लेख या सारखा मजकूरही या दिनदर्शिकेमध्ये असतो.

    Visit Us On FacebookVisit Us On InstagramVisit Us On Twitter